Maharashtra Politics: शिंदेंच्या सेनेशी युती नकोच, ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेशी युती करण्यास सक्त मनाई केली आहे, तर दुसरीकडे मतदार यादीतील गोंधळावरून ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चाला काँग्रेसने (Congress) केवळ नाममात्र पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. 'आम्ही बाजूला बसू पण शिंदेंच्या सेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही', असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. पक्ष फोडून सरकार पाडल्याचा उद्धव ठाकरेंचा राग अजूनही कायम असल्याचे यातून दिसून येते. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवण्यावर ते ठाम आहेत. याचवेळी, मतदार याद्यांमधील कथित घोळाच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'मध्ये काँग्रेस सहभागी झाली, पण त्यांचे प्रदेशाध्यक्ष बैठकीला आणि निवडणूक आयुक्तांशी झालेल्या चर्चेला अनुपस्थित राहिल्याने आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement