Parth Pawar Land Deal: 'माझ्या नावाचा गैरवापर चालणार नाही', अजित पवारांचा इशारा

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपांमुळे राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हे आरोप केले आहेत. 'माझ्या नावाचा कोणी गैरवापर केलेला मला चालणार नाही,' असा स्पष्ट इशारा देत अजित पवार यांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, असेही सांगितले आहे. अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीने १,८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केली. या मोठ्या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आणि हा संपूर्ण व्यवहार फक्त २७ दिवसांत पूर्ण झाला, असा दावाही दानवे यांनी केला आहे. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे शक्य झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, एका तहसीलदाराला निलंबितही केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola