Uddhav Thackeray : शक्तिपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावरुन जाणारा महामार्ग, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway), पन्नास खोके (Pannas Khoke) आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘शेतकऱ्याच्या उरावरून रस्ता नेऊन शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री विकास म्हणतात’, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारासाठी जातात पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही हे विचारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ ६ रुपये मिळाल्याचा पुरावा देत त्यांनी सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. सत्तेसाठी दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी आम्हाला घर सोडण्यावरून बोलू नये, असे म्हणत त्यांनी 'पन्नास खोके' घेणाऱ्यांना 'बाजारबसवी' संबोधले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement