Pune Land Scam Parth Pawar यांनी Ambadas Danve यांचे सर्व आरोप फेटाळले
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हे आरोप केले आहेत. 'आम्ही कुठलाही चुकीचा घोटाळा केला नाही किंवा चुकीचं काम केलं नाही,' असे स्पष्टीकरण देत पार्थ पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'एबीपी माझा'ने या संदर्भात पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवरून ही प्रतिक्रिया दिली, मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला. दानवेंच्या आरोपानुसार, पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये सुमारे १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतली आणि त्यासाठी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) देखील नियबाह्य पद्धतीने माफ करण्यात आले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध नेत्यांकडून चौकशीची मागणी केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement