Uddhav Thackeray : शेतकऱ्याला कर्जमुक्ती हवी, माफी नको; सरकारवर ठाकरेंचा घणाघात
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि पीक नुकसानीच्या पंचनाम्यांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'माफी गुन्हेगाराला करतात, शेतकऱ्याला कर्जमुक्ती पाहिजे', असे खडे बोल सुनावत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या कृषीमंत्री कोण आहेत, हेच लोकांना माहीत नाही, अशी टीका करत त्यांनी प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी पूर्ववत व्हायला दोन ते तीन वर्षे लागतील, पण सरकार पंचनामे कसे करणार, कारण शेतकरी पुढच्या पेरणीला लागला आहे, असा सवाल त्यांनी केला. 'MNREGA' मधून साडेतीन लाख रुपये कसे देणार, हा सर्व बोगस कारभार आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या मदतीच्या घोषणेवर टीका केली. जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement