Majha Impact: 'शिवभोजन' थाळीसाठी मराठवाड्याला 13.62 कोटी, 'माझा'च्या बातमीनंतर सरकारला जाग

Continues below advertisement
‘माझा इम्पॅक्ट’नंतर (Majha Impact) मराठवाड्यातील (Marathwada) शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या शिवभोजन थाळी योजनेसाठी शासनाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी १३ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 'माझा'ने शिवभोजन थाळी चालकांच्या व्यथा मांडल्यानंतर शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी छत्रपती संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधिक ३ कोटी ३७ लाख, नांदेडला (Nanded) २ कोटी ३२ लाख, बीडला (Beed) २ कोटी २७ लाख, जालन्याला (Jalna) १ कोटी ३० लाख, लातूरला (Latur) १ कोटी २७ लाख, परभणीला (Parbhani) १ कोटी २२ लाख, हिंगोलीला (Hingoli) ८४ लाख आणि धाराशिवला (Dharashiv) ६९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola