Maharashtra Politics: 'शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाही', Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, पीक कर्ज आणि सरकारच्या आश्वासनांवरून भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य केले. 'माझा शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाहीये तो प्रामाणिक आहे, तो चोर नाहीये', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पाळले नाही, अशी टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 'हातपाय हलवा' असा सल्ला दिल्याने, 'तुम्ही सरकार हलवताय का?' असा खोचक सवाल ठाकरेंनी विचारला. आगामी नगरपरिषद, पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनता या सरकारला जागा दाखवून देईल आणि आम्हीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola