Starlink in Maharashtra: 'दुर्गम भागात आता सॅटेलाइट इंटरनेट', सरकारचा मोठा करार
Continues below advertisement
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील दुर्गम भागात उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी इलॉन मस्कच्या (Elon Musk) स्टारलिंक (Starlink) कंपनीसोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. 'या ऐतिहासिक निर्णयामुळे, महाराष्ट्र उपग्रह-सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये भारताचे नेतृत्व करेल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा करार 'डिजिटल महाराष्ट्र' (Digital Maharashtra) या मोहिमेचा एक भाग आहे. याअंतर्गत गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या जिल्ह्यांमधील सरकारी संस्था, ग्रामपंचायती, शाळा आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांना हाय-स्पीड इंटरनेट पुरवले जाईल. स्टारलिंकसोबत औपचारिकपणे भागीदारी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ही सेवा सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आवश्यक नियामक मंजुरी मिळवणे बाकी आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement