Uddhav Thackeray PC : 'आशिष शेलार यांनी फडणवीसांनाच पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा टोला
Continues below advertisement
बोगस मतदार आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'आशिष शेलार यांनी नकळत देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलेलं आहे', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संपूर्ण मतदार यादी सदोष असून त्यात सुधारणा होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने जून २०२६ ची मुदत देण्यावरही त्यांनी टीका केली. '३० जून हा कोणता मुहूर्त आहे?' असा सवाल करत, आम्ही सत्तेत असताना कोणताही अभ्यास न करता दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. येत्या ५ तारखेपासून मराठवाडा दौऱ्यावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement