Pankaj Bhoyar : गतिमंद मुलाला अमानुष मारहाण, गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Continues below advertisement
ABP माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, छत्रपती संभाजीनगरमधील गतिमंद मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणाची गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दखल घेतली आहे. ‘याची चौकशी करून संबंधित जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहे. माणकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात शिपाई दीपक इंगळे याने एका गतिमंद विद्यार्थ्याला हात बांधून बेदम मारहाण केली होती. ABP माझाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने, सरकारने याकडे गांभीर्याने पाहून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement