Uddhav Thackeray's Strategy : सरकारला सळो की पळो करा,उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश
उद्धव ठाकरे यांनी खासदारांना सरकारला सळो की पळो करून सोडण्याचे आदेश दिले आहेत. काल रात्री खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या विविध अडचणी समजून घेतल्या. 'सत्ता हाच सरकारचा अजेंडा आहे, त्यामुळे जनहिताच्या मुद्द्यांवर तुम्ही जोरदार आवाज उठवा,' असे उद्धव ठाकरे यांनी खासदारांना सांगितले. जनहितासाठी संघर्ष हा शिवसेनेचा जन्मापासूनचा बाणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला शिवसेनेचे सर्व दहा खासदार उपस्थित होते, ज्यात दोन राज्यसभेचे आणि आठ लोकसभेचे खासदार होते. मुंबईतील खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील यांच्यासोबत महापालिका निवडणुकांच्या तयारीवर स्वतंत्र चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका आता सरकारच्या विरोधात, विरोधी पक्षाची असणार हे स्पष्ट झाले आहे. 'ऑपरेशन टायगर'ची देखील चर्चा झाली.