Eknath Shinde Meet Amit Shah : एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत, दिल्लीवारी कशासाठी
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांच्यासोबत सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान शिवसेनेच्या खासदारांसहही शहा यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सूनबाई उपस्थित होत्या. शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली. 'ऑपरेशन महादेव'च्या यशामुळे शंकराची प्रतिमा भेट दिल्याचे शिंदेंनी सांगितले. भेटीनंतर बोलताना, "आमची महायुती आहे. आमचं महायुती मजबुतीने दोन्ही निवडणुका लढली आहे, दोन्ही निवडणुका जिंकली, देश प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला, महाराष्ट्रदेखील आम्ही जिंकला आणि आता पुढे महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू," असे शिंदे म्हणाले. महायुतीची ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील महायुतीतील अडचणी आणि कुरबुरींवर राज्यातच चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोदी आणि शहा यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेमुळे राज्याचे अनेक मुद्दे निकाली निघाल्याचे समजते. केंद्रात केवळ धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली.