Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Listठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी,65 उमेदवारांचा यादीत समावेश

Continues below advertisement

Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Listठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी,65 उमेदवारांचा यादीत समावेश
शिवसेना ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर.. 
ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर...कोपरी-पाचपाखडीतून शिंदेंविरोधात केदार दिघे, तर ठाण्यातून राजन विचारे रिंगणात...
महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena) आघाडी घेतली आहे. शिवसेना युबीटी पक्षाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram