Uddhav Thackeray Dharashiv : 'शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, पाठीत खंजीर खुपसला', सरकारवर घणाघात
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिवच्या (Dharashiv) भूम तालुक्यातील पाथरुडमध्ये (Pathrud) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. 'एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय महाराष्ट्रामधे प्राप्त झाला?', असा संतप्त सवाल यावेळी एका शेतकऱ्याने केला. सरकारने NDRF निकषांनुसार मदतीच्या केवळ घोषणा केल्या असून, एक रुपयाही खात्यात जमा झाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. गावातील सुमारे ७० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे जमिनी खरवडून गेल्या, विहिरी गाळाने भरल्या, तरी पंचनामे होऊनही मदत मिळाली नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. हे लोकशाही नसून 'ठोकशाही' आहे, असं म्हणत शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement