Voter Fraud: 'माझ्यावर गुन्हा, आता Rahul Gandhi यांचं काय?,' Rohit Pawar यांचा थेट BJP ला सवाल

Continues below advertisement
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरोपांवरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 'बनावट आधारकार्ड कसं बनवलं जातं याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा आधारकार्ड बनवून दाखवलं म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता,' असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी हरियाणात (Haryana) ब्राझिलियन मॉडेल मॅथ्यू फेरेरोच्या (Mathew Ferrero) नावाने दहा वेगवेगळ्या बूथवर बावीस वेळा मतदार नोंदणी झाल्याचा पुरावा सादर केल्याचा दावा पवारांनी केला. राहुल गांधींचा हा डेमो पाहून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola