पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी, प्रबोधनकारांवरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं परखड मत
पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी असल्याचं परखड मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. प्रबोधन नियतकालिकेतील केशव सीताराम ठाकरे यांचे लेख असलेले प्रबोधनमधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन काल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा विभागाचे राज्य मंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत आणि महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पणही करण्यात आलं.