Uddhav Thackeray Meeting : स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात लवकरच निर्णय घ्या, ठाकरेंच्या सूचना
उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. स्थानिक पातळीवर जागा वाटपाबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, मतदार याद्यांची आतापासूनच तपासणी करून त्यावरील तक्रारी नोंदवण्यास सांगितले. मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणण्यास सांगितले. आघाडीसोबत किंवा मनसेसोबत युतीबाबत लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले. पक्षाची ताकद असलेल्या जागांचा विचार करून स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात मत मांडण्यास सांगितले. यामुळे पक्ष म्हणून निर्णय घेणे सोपे होईल. निवडणुका कधीही लागू शकतात, त्यामुळे तयारी सुरू ठेवण्यास सांगितले. उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, "पंतप्रधानांनी भावनांशी खेळ केला." याच्या निषेधार्थ 14 तारखेला ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे. भारत-पाकिस्तान मॅचचा निषेध केला जाईल. महिला आघाडीने पंतप्रधानांना सिंदूर पाठवावा, अशा सूचनाही जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या.