Anna Dhane On Dhairysheel Mohite : धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर वाल्मिक कराड, अण्णा ढाणेंचा आरोप

कुरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड असल्याची टीका केली आहे. अकलूज परिसरात सोळा ते सतरा तरुण मुलांची हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अकलूजमध्ये झालेल्या खुनांची सिरीयल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लावल्याचा दावा अण्णा ढाणे यांनी केला. या आरोपांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "ज्या गोष्टी आहेत जे कोण काही बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीस उत्तर देईन. मी पहिल्या दिवसापासून कायद्यानेच बोलतोय पुराव्यासहित बोलतोय आणि हे नुसतं कुडूपुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी आळोआळून मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ते पुराव्यासहित काढीन आणि मी काढतोय ते सगळे शासकीय जागेतन काढतोय," असे खासदार मोहिते पाटील यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अकलूजच्या जनतेनेच ठरवावे की ते वाल्मिक कराड आहेत की नाही. या प्रकरणाची व्याप्ती केवळ कुरडूपुरती मर्यादित नसून, इतर ठिकाणीही अनेक प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola