Maharashtra Politics: 'दिवाळीत Mahishasur मारल्याशिवाय राहणार नाही', Thackeray यांचा थेट इशारा
Continues below advertisement
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. येणाऱ्या दिवाळीत महिषासुर मारल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील धाराशिवमधील एक भावनिक आठवण सांगितली. ते म्हणाले की, ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी एक गरीब, मळके कपडे घातलेला शेतकरी व्यासपीठावर आला आणि त्याने निवडणुकीसाठी मदत म्हणून एक रुपया दिला. या शेतकऱ्याचा एक रुपया गद्दारांच्या हजार कोटींच्या बरोबरीचा आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेला सलाम केला. ज्यांना आमिषं दाखवून पदं दिली जात आहेत, त्यांचा वापर संपल्यावर त्यांना कचराकुंडीत फेकून दिलं जाईल आणि ते कपाळावर हात मारत फिरतील, असा घणाघातही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement