Thane Eknath Shinde VS BJP: 'ठाण्यात कमळ उगवून दाखवेल', CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे Ganesh Naik प्रभारी
Continues below advertisement
ठाण्यातील महायुतीमधील संघर्ष आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांची ठाणे जिल्हा निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटासोबत युती करण्यास दिलेला स्पष्ट नकार, यावर राजू वाघमारे (Raju Waghmare) आणि अखिल चित्रे (Akhil Chitre) यांच्यात जोरदार चर्चा झाली. 'शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको', असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे खचले असल्याचा दावा केला, तसेच ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आमच्या पक्षात येत असल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देताना, ते नगरसेवक नसून 'माजी नगरसेवक' आहेत, अशी दुरुस्ती करत अखिल चित्रेंनी पलटवार केला. गणेश नाईक यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात, जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, महायुतीमध्येच आव्हान उभे राहिले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement