Uddhav Thackeray : बँकेच्या कर्जापायी जीव दिला, सरकारला जाब कोण विचारणार?
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बँकेच्या कर्जामुळे यशोदा आबाजी राठोड या ६८ वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. 'का मुख्यमंत्री का न जात यांच्या घरी?' असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. सध्या मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी, राज्यातील शेतकरी सर्वत्र संकटात असल्याचे म्हटले. आपण सत्तेत नसलो तरी आपले कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री असताना कोणताही गाजावाजा न करता कर्जमुक्ती केली होती, याची आठवण करून देत, आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement