Manoj Jarange Conspiracy: 'मला संपवण्यासाठी अडीच कोटींची सुपारी', मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
Continues below advertisement
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'एका मोठ्या नेत्याने आपल्या हत्येचा कट रचला होता', असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे आणि त्यासाठी बीड (Beed) जिल्ह्यात गुप्त बैठका झाल्याचेही उघड झाले आहे. जरांगे यांच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी (Jalna Police) तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आपण शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे सादर करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement