Thackeray Unity | 'ठाकरे ब्रँड' लोकांचा, आता राजही सोबत; उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 'ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला आहे, आता राजही सोबत आला आहे,' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची महामुलाखत आज सामनामध्ये प्रदर्शित झाली. या मुलाखतीच्या पहिल्या भागात त्यांनी युतीबाबत विस्तृत भाष्य केले नसले तरी राज ठाकरे सोबत आल्याचे नमूद केले आहे. ठाकरे हे वारे नाहीत. ठाकरे कुटुंबाची पाळेमुळे अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोलवर रुजलेली आहेत. माझ्या आजोबांपासून शिवसेना प्रमुख म्हणून मी आहे, आदित्य आहे, आणि आता राजही सोबत आलेला आहे, असे त्यांनी सांगितले. ठाकरे म्हणजे नेहमीच संघर्ष. हा संघर्ष स्वार्थी हेतूंसाठी नसून समाजाच्या हितासाठी करत आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा जे काही अनिष्ट आहे, त्याच्या विरोधात संघर्ष करत आलो आहोत. लोकांनीच 'ठाकरे ब्रँड' स्वीकारला आहे, तो आम्ही बनवलेला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.