Raj Thackeray Language Row | हिंदी सक्ती, Mumbai Gujarat वाद; Raj Thackeray यांचा आक्रमक पवित्रा!

मीरा रोड येथील सभेत राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिले की, हिंदी सक्ती लागू केल्यास दुकाने आणि शाळाही बंद करू. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. निशिकांत दुबेंना मुंबईत येऊन दाखवावे, त्यांना "मुंबईके समुदरमें डुबे-डुबेकर मारेंगे" असे राज ठाकरे म्हणाले. मराठी येत नसेल तर "कानाखाली बसणारच" असा इशाराही त्यांनी अमराठी लोकांना दिला. राज ठाकरेंनी असा दावा केला की, मुंबई हळूहळू गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव सुरू आहे. मिरा भाईंदरपासून पालघरपर्यंतचे मतदारसंघ अमराठी लोकांचे बनवून मुंबईला गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर निशिकांत दुबेंनी पलटवार करत मुंबई गुजरातचाच भाग होती असे विधान केले. मुंबईत केवळ ३१-३२ टक्के मराठी भाषिक लोक राहतात असेही दुबेंनी नमूद केले. हिंदी भाषेमुळे जवळपास २५० भाषा नष्ट झाल्या असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील नट-कलाकारांशिवाय कोणाचेही भले झाले नाही, असेही राज ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्रात शांतपणे राहावे, मराठी शिकावे, अन्यथा महाराष्ट्राचा दणका बसेल असा इशाराही त्यांनी दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola