Marathwada Tour: 'हा पॅकेज घोटाळा आहे', Shaktipeeth महामार्गावरून Uddhav Thackeray यांचा हल्लाबोल

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अर्धापूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि सरकारच्या शेतकरी पॅकेजवरून सरकारवर जोरदार टीका केली. ‘शहाऐंशी हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग बांधला जातोय, मात्र कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत का?’ असा सवाल ठाकरेंनी केला. त्यांनी सरकारच्या पॅकेजला 'पॅकेज घोटाळा' संबोधले आणि त्यात आधीच्याच पॅकेजमधील २२०० कोटी रुपये टाकल्याचा आरोप केला. महामार्गाच्या आजूबाजूला जमिनी कोण खरेदी करत आहे, हे पाहण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. सरकारने जाहीर केलेली मदत 'ठिबक सिंचना'प्रमाणे थेंब थेंब मिळत असल्याची टीका करत, आतापर्यंत 'मन की बात' ऐकली, आता 'जन की बात' ऐका, असे ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola