Uddhav Thackeray : अदानींना जमत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करा : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : मुंबईची अदानी सिटी करण्याचा कट उधळणार : उद्धव ठाकरे : ABP Majha
धारावीबाबत अदानींना जमत नसेल तर टेंडर रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत केली. लाडका मित्र, लाडका, काँट्रॅक्टर, लाडका सूटबूटवाला अशी सरकारची योजना आहे अशी टीका ठाकरेंनी आज केली. धारावीकरांना आहे त्याच जागी ५०० फुटांचं घर द्या, त्यांच्या व्यवसायाची आहे तिथेच सोय करा अशी मागणी त्यांनी केली. धारावीतल्या लोकांना मुंबईतल्या इतर प्रकल्पांच्या जागी हाकलून देत नव्या झोेपडपट्ट्या निर्माण करण्याचा कट आहे असा आरोप त्यांनी केला.