Uddhav Thackeray MVA Leaders : मविआचे खरे 'दादा' उद्धव ठाकरेच?
abp majha web team
Updated at:
03 Apr 2023 05:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसची ही नाराजी समोर येण्याचं कारण ठरली कालची वज्रमूठ सभा.... कारण या सभेनंतर महाविकास प्रमुख नेते उद्धव ठाकरेच आहेत का, अशी चर्चा सुरू झाली .... सभेमध्ये ठाकरेंना तसंच प्रोजेक्ट केलं गेलं. उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली तेव्हा आतषबाजी करण्यात आली. त्यांचा मंचावर प्रवेश होताच अन्य सर्व नेते उभे राहिले.. तसंच, त्यांच्यासाठी जी खुर्ची ठेवण्यात आली होती, ती देखील स्पेशल खुर्ची होती. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार असो किंवा जयंत पाटील.. अशोक चव्हाण असो किंवा धनंजय मुंडे.. सर्वांनीच आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा आदरपूर्व उल्लेख केला.