Hindi Morcha | हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन
हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहे. आज दुपारी तीन वाजता राज्यभरात हिंदीच्या जी आर ची होळी करण्यात येणार आहे. आझाद मैदानात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची होळी करण्यात येणार. काँग्रेससह अन्य विरोधीपक्ष देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात शासन निर्णयांच्या प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा होणार आहे.