Hambarda Morcha UTB Shivsena : 'सातबारा कोरा करा', ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाने वेधले लक्ष

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या (UBT) 'हंबर्डा मोर्चा'चे आयोजन करण्यात आले. 'आमचा सातबारा कोरा झालाच पाहिजे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजेत', अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने जाहीर केलेले ३१ हजार कोटींचे पॅकेज अपुरे असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची (Loan Waiver) मागणी केली आहे. पीक विम्याचे (Crop Insurance) निकष शिथिल करावेत आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागण्यांसाठीही शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी असून, दिवाळीपूर्वी थेट खात्यात मदत जमा करावी, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola