Sandipan Bhumare On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे केवळ नाटक करतात, संदिपान भुमरेंचा निशाणा

Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. 'उद्धव साहेब हे नाटक करतात, मुख्यमंत्री असताना त्यांनी किती मदत केली?' असा सवाल संदिपान भुमरे यांनी केला. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय शिरसाट यांनी या मोर्चाला 'हंबर्डा मोर्चा' असे संबोधले, तर अर्जुन खोतकर यांनी सरकारने आधीच ३१ हजार कोटींचे पॅकेज दिल्याचे म्हटले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि पीक विम्याचे जुने निकष लागू करावेत या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola