Maharashtra Politics: 'आरसा बघा', मुख्यमंत्र्यांच्या टीकेला Uddhav Thackeray मोर्चातून काय उत्तर देणार?
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात 'हंबर्डा मोर्चा' काढण्यात आला. 'जर उद्धव ठाकरेंनी आरसा पाहिला किंवा सरकारनं जाहीर केलेली मदत पाहिली तर ते अशा पद्धतीचा मोर्चा रद्द करतील,' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. या मोर्चात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची प्रमुख मागणी करण्यात आली. क्रांती चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते सहभागी झाले. सरकारने जाहीर केलेले ३१ हजार कोटींचे पॅकेज हे फसवे असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या मोर्चाला प्रतिसाद म्हणून सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात आली होती, ज्याला उद्धव ठाकरे सभेतून उत्तर देण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement