Uddhav Thackeray Delhi Meeting : उद्धव ठाकरेेंचा दिल्लीत दुसरा दिवस, इंडिया आघाडीची महत्वाची बैठक
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर राहुल गांधींच्या स्नेह भोजनालाही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित असतील. संजय राऊत यांनी सांगितले की, इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे. आगामी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, मोदी सरकार विरोधातली पुढची रणनीती आणि बिहार निवडणुका यांवर आजच्या बैठकीत रणनीती ठरेल अशी माहिती आहे. दिल्लीमध्ये आज सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडी, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि मनसेसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे महत्त्वपूर्ण भाष्य करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौराही चर्चेत आहे.