Uddhav Thackeray Group Vidhansabha ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत
Uddhav Thackeray Group Vidhansabha ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत
ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार... मुंबईत ठाकरे गटाकडून २५ जागांची तयारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट मुंबईती 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याची तयारी लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही राहणार महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत 36 पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे रहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करेल वांद्रे पूर्व मधून वरून सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता, शिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत ...तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला, 2024 च्या लोकसभा निवडणूक सुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल महाविकास आघाडीत मुंबईतील शिवसेना ठाकरे गट या जागा लढवण्याची शक्यता