Navi Mumbai : नवी मुंबईत ठाकरे गट - शिंदे गट एकत्र, दिघा भुयारी मार्गाचं एकत्र केलं उद्घाटन

Continues below advertisement

Thane Digha Tunnel : शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेला दुरावा अजून दूर झालेला नाही. पण दिघा रेल्वे स्थानकापाठोपाठ ऐरोली-कळवा एलिव्हटेड पुलाच्या मार्गातील ईश्वर नगर ते सावित्रीबाई नगर रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गाच्या उद्घाटनासाठी उभय गटांचे स्थानिक नेते एकत्र आल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश गवते यांच्या उपस्थितीत भुयारी मार्गाचं उद्घाटन पार पडलं. नवी मुंबईत भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गट यांच्याकडून एकाच कामाची दोनदोनदा उद्घाटन करण्यात येत होती. पण भुयारी मार्गाच्या लोकार्पणासाठी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून या भुयारी मार्गाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram