Uddhav Thackeray : लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंची मागणी
Continues below advertisement
मराठवाड्यातील (Marathwada) पूरस्थिती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'जाहीर केलेल्या एकतीस हजार आठशे कोटींपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले?', असा सवाल करत ठाकरे यांनी सरकारच्या ३१,६२८ कोटींच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले असून, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपयांची तात्काळ मदत द्यावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 'लाडकी बहीण' (Ladki Behen) योजनेअंतर्गत दिलेले आश्वासन पाळून प्रत्येक बहिणीच्या खात्यात २१०० रुपये जमा करावेत, असेही ते म्हणाले. सरकारने केवळ घोषणा करू नयेत, तर प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement