Uddhav Thackeray : 'मतचोरीचा लाभ कोणी घेतला? मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा'- ठाकरे

Continues below advertisement
कथित मतचोरीच्या (Vote Theft) मुद्द्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मतचोरी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनाही मान्य आहे, त्यामुळे मतचोरीचा कोणी लाभ घेतला आहे याचा मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा', अशी थेट मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणी शांत न बसता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. मतचोरीच्या विरोधात सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. जनतेच्या न्यायालयातून न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, अन्यथा जनतेचे न्यायालय अंतिम निर्णय घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. हा लढा केवळ शिवसेनेचा नसून लोकशाही टिकवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola