Raj Thackeray Satyacha Morcha:आजचा मोर्चा हा राग दाखविण्याचा, ताकद दाखविण्याचा मोर्चा आहे-राज ठाकरे

Continues below advertisement
मुंबईत आज मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि मनसेने (MNS) 'सत्याचा मोर्चा' काढला. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. 'आजचा मोर्चा हा राग दाखविण्याचा, ताकद दाखविण्याचा, दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याचा मोर्चा आहे,' असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले. मतदार याद्या साफ करून त्या पारदर्शक केल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी विरोधकांनी केली. दुबार मतदार असल्याचं सर्वच पक्ष मान्य करत असताना निवडणुकांची घाई का केली जात आहे, असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हा मोर्चा मुंबईतील फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ संपला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola