Shinde vs Thackeray : ठाकरे गटाचा प्लॅन ठरला? शिंदे गटान सादर केलेली कागद पत्र आयोगाकडे मागणार

शिवसेनेतल्या सत्तासंघर्षाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या उंबरठ्यावर दाखल झाली आहे. पण या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं केलेल्या दाव्यांची प्रत आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत आधी आम्हाला मिळावी, अशी विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगातल्या लढाईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना हे पहिलं पाऊल उचलणार आहे. जेणेकरून शिंदे गटाच्या दाव्यांची तपासणी करून, त्यादृष्टीनं आवश्यक कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करता येईल, यासाठी ठाकरे गटाकडून ही विनंती करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola