Zero Hour : अॅनाकॉन्डा टीकेवरून घमासान, विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये वार-पलटवार
Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'तो अॅनाकॉन्डा सगळं गिळणारा साप आज येऊन गेला, नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही,' असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी अमित शहांना दिला आहे. या टीकेनंतर महायुतीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना 'अजगर' म्हटले आहे, तर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी 'आयत्या बिळावरचे नागोबा' म्हणून टीका केली. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांनाच 'भस्म्यरोग झालेला अॅनाकॉन्डा' संबोधत प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे या राजकीय वादाला नवे तोंड फुटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement