Politics Cartoon War हा Doremon कोण?'शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांचा सवाल; नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
पुण्याच्या राजकारणात आता कार्टून कॅरेक्टर्सची एंट्री झाली असून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे (BJP) प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यात एक नवीन वाद सुरू झाला आहे. 'बाकी सगळं ठीक आहे मला एक गोष्ट सांगा हा डोरेमॉन कोण आहे?', असा प्रश्न धंगेकर यांनी नवनाथ बन यांचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर विचारला. याला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी धंगेकरांना 'बावळट नोबिता' (Nobita) असे संबोधले. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि धंगेकर यांच्यात वाद सुरू असताना, धंगेकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना बन यांनी धंगेकरांवर निशाणा साधला होता, ज्यानंतर या कार्टून वॉरला सुरुवात झाली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement