Uddhav Thackeray | राज्यपालाच्या कोट्यातून उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली. राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा नेटाने सामना करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे आमदार नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola