Uddhav Thackeray On BJP: 'निवडणूक आयोग भाजपचा नोकर', ठाकरेंचा हल्लाबोल

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'आम्ही जे म्हणतोय की निवडणूक आयोग हा भाजपाचा नोकर आहे कारण आम्ही निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारतोय, त्याच उत्तर त्यांचे मालक का देत आहेत?', असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आशिष शेलार यांनीच देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) 'पप्पू' ठरवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्तांनाही नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि 'व्होट चोरी' यांसारख्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार देशभक्तीचा वापर करत असून, भाजप ही 'स्वयंघोषित देशभक्तांची बोगस टोळी' आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola