Pune Land Deal: 'अजित पवारांनी जमीन खाल्ली, मुख्यमंत्री पांघरूण घालतायत'; उद्धव ठाकरेंचा थेट आरोप
Continues below advertisement
पुण्यातील मुंडवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'अजित पवार यांनी जमीन खाल्ली आणि त्यावरती पांघरुण घालण्यासाठी मुख्यमंत्री बसले आहेत,' अशी थेट टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दुसरीकडे, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीने सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement