Maharashtra Politics: 'शिंदे सेनेशी युती नाही' Uddhav Thackeray यांच्या आदेशाला Kankavli त बगल?
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे स्थानिक नेते एकत्र येण्याची शक्यता असून, माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांच्यात एक गुप्त बैठक पार पडली आहे. 'कुठेही शिंदे सेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या,' असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेले असतानाच कणकवलीत हे घडत आहे. या बैठकीत संदेश पारकर (Sandesh Parker) यांना 'शहर विकास आघाडी'चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पुढे करून भाजपला आव्हान देण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. दोन्ही गटांतील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक लढवल्यास सिंधुदुर्गासह राज्याच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. येत्या दोन दिवसांत या आघाडीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement