Shaktipeeth Scam: 'अजित पवारांच्या मुलाचा जमिनींमध्ये हात', Uddhav Thackeray यांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शक्तिपीठ महामार्गावरून (Shaktipeeth Mahamarg) सरकारवर जोरदार टीका केली आहे. या महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुलासह सत्ताधारिकांचे दलाल खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ठाकरे म्हणाले, 'शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती'. हा महामार्ग म्हणजे केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याची आणि कमिशन खाण्याची योजना असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे ८६,३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव देण्यासाठी नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गाच्या वेळी आपण शेतकऱ्यांची बाजू घेऊन मार्ग बदलण्यास आणि योग्य मोबदला मिळवून देण्यास मदत केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola