Pune Land Deal: 'FIR मध्येही Scam, Parth Pawar चं नाव का नाही?', Anjali Damania यांचा थेट सवाल

Continues below advertisement
पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणी (Pune Land Deal) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एफआयआरमध्ये पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव वगळल्याबद्दल दमानिया यांनी ट्वीट करत प्रश्न उपस्थित केला, 'एफआयआर झाला पण त्यातही स्कॅम। पार्थ अजित पवाराचं नाव नाही आणि कंपनीचं पण नाव नाही का?'. यातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, राजकारण थांबवून तातडीने चौकशी करून शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन होणाऱ्या समितीत केवळ शासकीय अधिकारी न ठेवता जनतेच्या प्रतिनिधींचाही समावेश असावा, असे मत त्यांनी मांडले आहे. इतकेच नाही, तर या समितीमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण स्वतः तयार असल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola