Uddhav Thackeraay On BJP: जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा येईल', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Continues below advertisement
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या (MNS) 'सत्याच्या मोर्चा'त मतदार यादीतील गोंधळावरून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आणि शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चार जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे,' असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी 'सक्षम' ॲपच्या माध्यमातून झालेल्या प्रकारावर केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळत, ज्या यादीवर MVA चे खासदार जिंकले तीच यादी आता चुकीची कशी, असा सवाल केला. उद्धव ठाकरेंनी अमित शहांचे नाव न घेता 'ॲनाकोंडा'ची उपमा देत इशारा दिला, तर 'ही केवळ एक ठिणगी आहे, याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही,' असेही म्हटले. दुसरीकडे, भाजप नेते अमित साटम यांनी 'ठाकरेंच्या घरातील चार मतं काढून काय होणार' असे म्हणत ही टीका म्हणजे वैफल्यातून आलेले वक्तव्य असल्याची खिल्ली उडवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola