Kartiki Ekadash Mahapuja : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न

Continues below advertisement
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सपत्नीक संपन्न झाली. या पूजेसाठी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रामराव वालेगावकर (Ramrao Walegaonkar) आणि सुशिलाबाई वालेगावकर (Sushilabai Walegaonkar) या वारकरी दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा बहुमान मिळाला. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागातून आलेल्या या वारकऱ्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, 'पांडुरंगाला म्हणाले बस झालं आता खूप झालं पाणी, आता थोडं शांत उघडून जावं'. गेली वीस वर्षे वारी करणाऱ्या वालेगावकर दाम्पत्याला अनपेक्षितपणे हा सन्मान मिळाल्याने त्यांचे डोळे पाणावले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही 'बळीराजाला सुखी ठेव आणि पाऊस पुरे झाला' असे साकडे विठ्ठलाला घातले. या महापूजेवेळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे आणि प्रथमच जिल्हा परिषदेचे दोन शाळकरी विद्यार्थीही उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola