Uddhav Thackeray : 'कोणतंही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल', उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला
Continues below advertisement
परभणीमध्ये (Parbhani) शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यातील (Marathwada) पूरस्थिती, शेतकरी आणि रखडलेली कर्जमुक्ती यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'भाजपवाले काय सांगतात? कोणतंही बटण दाबा मत आम्हालाच मिळेल', असा गंभीर आरोप करत त्यांनी (EVM) आणि बोगस मतदारांद्वारे सरकार मतचोरी करत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरण्याऐवजी बिहारमध्ये (Bihar) प्रचारात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवारांच्या (Ajit Pawar) 'शेतकऱ्यांना फुकटची सवय' या वक्तव्याचा समाचार घेताना, मराठवाड्यात शंभर वर्षांत आली नाही अशी आपत्ती आल्याचे ठाकरे म्हणाले. सरकारने पंचनामे करून तातडीने कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा गावकरी तहसीलदाराला घेराव घालतील असा इशारा त्यांनी दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement