Sanjay Raut Health:प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून साकडं, Sanjay Raut यांच्यासाठी Nashik मध्ये महापूजा
Continues below advertisement
नाशिक (Nashik) मध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांकडून कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Temple) रुद्र महापूजेचे आयोजन करण्यात आले. 'खासदार संजय राऊत साहेबांची प्रकृती ठणठणीत व्हावी, त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी महारुद्र अभिषेकाचं आयोजन केलं आहे,' असे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी सांगितले. या पूजेसाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी (D. G. Suryawanshi) यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख असल्याने त्यांचे नाशिकशी एक विशेष नाते आहे. नुकतेच, प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, या भावनेने गोदावरी घाटावरील जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या कपालेश्वर मंदिरात हा अभिषेक आणि महापूजा करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement